collage (7).jpg
collage (7).jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

मोदी, योगी आदित्यनाथ यांच्या राजवटीत अशाच निकालाची अपेक्षा : पवार

सरकारनामा ब्युरो

मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासह 32 नेत्यांची आज बाबरी मशीदप्रकरणी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. मात्र न्यायालयाच्या निर्णयानंतर आरोपप्रत्यारोप सुरूच आहेत. संपूर्ण देशाचे या निकालाकडे लक्ष लागले होते. या निकालावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राजवटीत असा निकाल लागेल, अशी अपेक्षा होती. त्यानुसारच निकाल लागला आहे. 

6 डिसेंबर 1992 मध्ये लाखो कारसेवकांच्या उपस्थित अयोध्येतील बाबरी मशिद पाडण्यात आली होती.देशात कॉंग्रेसचे सरकार होते आणि पी व्ही नरसिंहराव हे पंतप्रधान होते. ही मशीद पाडल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, की जर मशिद शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्याचा अभिमान आहे. भाजपसह देशभरातील हिदुत्ववादी संघटनांनी आजच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. 

अयोध्येप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने काही महिन्यापूर्वी निकाल दिला होता. त्यानंतर राम मंदिर भूमिपूजनचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला होता. वास्तविक राम मंदिराबाबत निकाल लागल्याने आजचा निकालही अपेक्षित होता अशा प्रतिक्रिया उमटल्या आहेत. 

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयने न्यायालयापुढे 351 साक्षीदार आणि सुमारे 600 कागदपत्रं पुरावा म्हणून सादर केले होते. 48 जणांविरोधात आरोप निश्‍चित करण्यात आले होते मात्र त्यापैकी 16जण खटला सुरु असताना मरण पावले. 16 व्या शतकातील ही मशीद पाडण्यासाठी आरोपींनी कारस्थान रचले आणि कारसेवकांना मशीद पाडण्यासाठी फूस लावली असा सीबीआयचा युक्तिवाद होता. 

अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना प्रकृतीच्या कारणास्तव गैरहजर राहण्याची मुभा देण्यात आली. तर उमा भारती यांना करोनाची लागण झाली असून, कल्याण सिंह सध्या उपचार घेत आहेत. एकूण 16आरोपी कोर्टात हजर होते. यामध्ये साध्वी ऋतंभरा, चंपत राय, विनय कटियार, ब्रिजमोहन शरण सिंग आणि इतर जणांचा समावेश होता.  
  
 लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, महंत नृत्य गोपाल दास, डॉ. राम विलास वेदांती, चंपत राय, महंत धर्मदास, कल्याण सिंह, उमा भारती, विनय कटियार, साघ्वी ऋतंभरा, सतीश प्रधान, पवन कुमार पांडेय, लल्लू सिंह, प्रकाश शर्मा, विजय बहादूर सिंह, संतोष दूबे, गांधी यादव, ओम प्रकाश पांडेय, अमर नाथ गोयल, जयभान सिंह पवैया, महाराज स्वामी साक्षी, विनय कुमार राय, नवीन भाई शुक्ला, आरएन श्रीवास्तव, रामजी गुप्ता, ब्रज भूषण शरण सिंह, कमलेश त्रिपाठी, रामचंद्र खत्री, जय भगवान गोयल, आचार्य धमेंद्र देव, सुधीर कुमार कक्कड़ आणि धर्मेंद्र सिंह गुर्जर यांच्यावर याप्रकरणी आरोप करण्यात आला होता. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT